या ४ भारतीय फलंदाजांची नावं जरी ऐकली तरी गोलंदाजांना येतं टेन्शन!

बेंगलोर | गुरुवारी सुरु झालेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामन्यात शिखर धवनने शतकी खेळी केली. ८७ चेंडूत ही शतकी खेळी करताना त्याने १९ चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली.

याबरोबर त्याने असा एक विक्रम केला जो कोणत्याही फलंदाजाला आपल्या नावावर झालेला नक्की आवडेल.

कसोटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी करताना १०० पेक्षा कमी चेंडू खेळणारा आणि अशी कामगिरी दोन वेळा करणारा तो चौथा भारतीय ठरला आहे.

विरेंद्र सेहवागने तब्बल ६वेळा कसोटीत १०० पेक्षा कमी चेंडूत शतक केले आहे तर कपील देव यांनी ३ तर मोहम्मह अझरुद्दीन यांनी २ वेळा हा कारनामा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टाॅप ५- कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंचपुर्वी शतकी खेळी करणारे खेळाडू

तब्बल ८७ सामन्यानंतर त्या खेळाडूची भारतीय संघात वापसी, सर्व विक्रम मोडीत