३९ वर्षांपूर्वीच्या विक्रमाला जसप्रीत बुमराहकडून धक्का

मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने 4 बाद 84 धावा केल्या आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने या सत्रात 2 विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.

बुमराहने आज घेतलेल्या या 2 विकेट्स बरोबरच 2018 या वर्षात कसोटीमध्ये 40 विकेट्स घेण्याचा टप्पाही पार केला आहे. बुमराहने याचवर्षी जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने या वर्षात 9 कसोटी सामने खेळताना 17 डावात 41 विकेट्स घेतल्या आहेत.

त्यामुळे भारताकडून पदार्पण केल्यानंतर पहिल्याच वर्षी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर झाला आहे. त्याने हा विक्रम करताना दिलीप दोषी यांच्या 40 विकेट्सला मागे टाकले आहे. दोषी यांनी 1979 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. याच वर्षी त्यांनी 10 कसोटी सामन्यात 40 विकेट्स घेतल्या होत्या.

याबरोबरच बुमराह हा कसोटीमध्ये एका वर्षात 40 विकेट्सचा टप्पा पार करणारा भारताचा सहावा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर ही भारतीय वेगवान गोलंदाजाने एका वर्षात कसोटीमध्ये 40 विकेट्स घेण्याचा टप्पा पार करण्याची केवळ 8 वी वेळ आहे. बुमराहच्या आधी या वर्षात हा टप्पा मोहम्मद शमीनेही पार केला आहे. त्याने यावर्षी 44 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.

भारताकडून कसोटी पदार्पणाच्या पहिल्या वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –

41* – जसप्रीत बुमराह (2018)

40 – दिलीप दोषी (1979)

37 – व्यंकटेश प्रसाद (1996)

36 – नरेंद्र हिरवानी (1988)

35 – एस श्रीशांत (2006)

महत्त्वाच्या बातम्या:

टीम न्यूझीलंडची घोषणा, १० महिन्यांनी द्विशतकवीर खेळाडू करतोय पुनरागमन

त्या एका गोष्टीसाठी रोहितला पहावी लागली ३६१ दिवस वाट

धोनीला डच्चू पक्का होता, परंतु या कारणामुळे झाली निवड