ब्रॉड, अँडरसन आणि कूक तिकडीचा खास विक्रम; द्रविड, सचिन आणि लक्ष्मणच्या विक्रमाचीही बरोबरी

पर्थ । ॲशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन आणि अॅलिस्टर कूक तिकडीने खास विक्रम केला आहे. हा सामना त्यांच्या तिघांनी एकत्र खेळलेल्या सामन्यातील १००वा सामना आहे.

इंग्लंडकडून अॅलिस्टर कूक १५०, जेम्स अँडरसन १३२ आणि स्टुअर्ट ब्रॉड ११२ कसोटी सामने खेळले आहेत. हे तिघेही एकाच वेळी कसोटी संघाचा भाग असणारा हा असा १००वा सामना आहे/

यापूर्वी अशी कामगिरी केवळ दोन तिकडींना करायला जमली आहे. त्यात ११८ सामने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण एकत्र खेळले आहेत तर १०३ सामने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली एकत्र खेळले आहेत.

तिकडींनी एकत्र खेळलेले सर्वाधिक कसोटी सामने
११८ सामने- सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण
१०३ सामने- सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली
१०० सामने- स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन आणि अॅलिस्टर कूक