धोनी नाहीतर रोहित शर्माच आहे खरा फिनिशर!!

इंदोर । रोहित शर्मा आणि कृणाल पांड्याने अखेरच्या १८ चेंडूंमध्ये ५१ धावा करत काल पंजाबविरुद्ध अशक्यप्राय विजयश्री खेचत आणली. पंजाबने दिलेल्या १७५ धावांचे आव्हान १९व्या षटकांत ४ बाद १७६ धावा करत मुंबईने पार केले. याचमुळे संघाने गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर मजल मारली.

या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने अफलातून फटकेबाजी करत १५ चेंडूत २४ धावा केल्या. त्यात त्याने २ षटकार आणि १ चौकार खेचला. त्याने मारलेला पहिला षटकार हा त्याचा टी२०मधील ३०० वा षटकार ठरला.

अन्य बातम्या- चर्चा तर खुप होतेय पण विराटला सरेकडून नक्की मिळणार तरी किती पैसे!

टी२०मध्ये ३०० षटकार खेचणारा तो ७वा खेळाडू ठरला तसेच अशी कामगिरी करणारा तो अशिया खंडातील पहिलाच खेळाडू ठरला.

परंतु एक असा विक्रम आहे ज्यात रोहीतने धोनीलाही मागे टाकले आहे. आपण धोनीला जगातील सर्वात्तम फिनिशर म्हणतो. धोनी हा जगातील सर्वोत्तम फिनिशर आहे यात कोणतीच शंका नाही. परंतु आयपीएलमध्ये मात्र रोहित हाच सर्वोत्तम फिनिशरठरला आहे.

अन्य बातम्या- इशांत शर्माने अशी काय कामगिरी केली ज्यामुळे पुजाराला केलं जातय ट्रोल!

आयपीएलमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना तो १७व्यांदा नाबाद राहिला. धावांचा यशस्वी पाठलाग सर्वाधिक वेळा नाबाद रहाणारा तो रविंद्र जडेजा आणि युसुफ पठाण नंतरचा तिसरा खेळाडू आहे.

धोनीला मात्र अशी कामगिरी १६ वेळा करता आली आहे.

आय़पीएलमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक वेळा नाबाद राहिलेले खेळाडू-

१९- रविंद्र जडेजा
१८- युसुफ पठाण
१७- रोहित शर्मा
१६- गौतम गंभीर
१६- एमएस धोनी
१५- सुरेश रैना
१५- ड्वेन ब्रावो

रोहितने २७९ टी२० सामन्यात ७२५० धावा करताना ३०१ षटकार खेचले आहेत. तसेच तो टी२० सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता १०व्या स्थानावर आला आहे.