पुजाराच कौतूक करताना बुमराहच्या या विश्वविक्रमाकडे होतेय दुर्लक्ष

अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवला. यामुळे भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

या सामन्यात सामनावीर म्हणून भारताचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणारा चेतेश्वर पुजाराचे नाव घोषीत करण्यात आले. या सामन्यात भारताकडून अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह तसेच आर अश्विनने चमकदार कामगिरी केली. हा विजय खऱ्या अर्थाने सांघिक होता.

जसप्रीत बुमराहचा हा केवळ ७वा कसोटी सामना होता. या ७ कसोटी सामन्यात २४.४४च्या सरासरीने बुमराहने तब्बल ३४ विकेट्स घेतल्या आहेत. यात २ वेळा त्याने डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत.

याबरोबर कारकिर्दीतील पहिल्या ७ कसोटीनंतर भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आला आहे. भारताकडून ७ कसोटी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम शांतनुकुमार श्रीशांतच्या नावावर आहे. त्याने पहिल्या ७ कसोटीत ३५ विकेट्स घेतल्या होत्या.

भारताकडून पहिल्या ७ कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

३५- शांतनुकुमार श्रीशांत

३४- जसप्रीत बुमराह

२९- मोहम्मद शमी

२८- अमर सिंग

महत्त्वाच्या बातम्या:

सामना संपल्यावर टीम इंडियातील या दोन खेळाडूंना ३० मिनीटांनीच सुरु केला सराव

५३० कसोटी सामने खेळलेल्या टीम इंडियाने पहिल्यांदाचा केला असा कारनामा

असं एक खास समीकरण, जे घडल तर कोहलीची टीम इंडिया मिळवते १०० टक्के विजय