२० वर्षीय राशिद खानचा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा पराक्रम

15 सप्टेंबरला एशिया कप 2018 या स्पर्धेला सुरुवात झाली. आता स्पर्धेचा मध्यांतर झाला आहे त्यामुळे चुरस वाढत चालली आहे.

दुबईत झालेल्या सुपर  फोरच्या  पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेशाचा मोठ्या फरकाने  पराभव केला.

दुसरा सामना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात अबुधाबीत झाला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी संघर्ष करावा लागला. पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब मलिकने आपला अनुभव पणाला लावत अखेर पाकिस्तानला विजय मिळून दिला.

ह्या सामन्यात अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशिद खाने 10 षटकात 48 धावा देत पाकिस्तानचे तीन खेळाडू बाद करत एका अनोख्या विश्वविक्रमाला गवसणी घातली.

त्याने 50 वनडे सामन्यांत सर्वात जलद 115  विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. याबाबतीत त्याने इतर गोलंदाजांना खूपच मागे टाकले आहे.

आपल्या पहिल्या 50 सामन्यात सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम अॉस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर होता. त्याने आपल्या पहिल्या 50 सामन्यात 98 बळी घेतले होते.

त्या खालोखाल न्युझीलंडचा वेगवान गोलंदाज शेन बॉंडने आपल्या पहिल्या 50 सामन्यात 95 विकेट घेतल्या होत्या.

पाकिस्तानच्या साकलेन मुश्ताकने आपल्या  पहिल्या 50 सामन्यात 93 विकेट घेतल्या होत्या.  अॉस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेटली आणि पाकिस्तानचा वेगवान मोहम्मद सामी यांनी आपल्या पहिल्या 50 सामन्यात प्रत्येकी 91 विकेट घेतल्या होत्या.

राशिद खानने यांच्या खूपच पढे मजल मारली. त्याने आपले पहिले 100 विकेट फक्त 44 वनडे सामन्यांत घेतलेल्या आहेत. सर्वात जलद 100 बळी घेण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे.

कारकिर्दीतील पहिल्या ५० सामन्यांत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-

११५- राशिद खान, अफगाणिस्तान

९८- मिचेल स्टार्क, आॅस्ट्रेलिया

९५- शेन बाॅंड, न्युझीलंड

९३- साकलेन मुश्ताक, पाकिस्तान

९१- ब्रेट ली, आॅस्ट्रेलिया

९१- मोहम्मद समी, पाकिस्तान

महत्त्वाच्या बातम्या:

एशिया कप २०१८: भारताचा बांगलादेशवर मोठा विजय; कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक

Video: धोनीच्या हुशारीने मिळवून दिली टीम इंडियाला ही महत्त्वाची विकेट

वाढदिवस विशेष: सिक्सर किंग ख्रिस गेलबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी