विराट कोहलीच्या टीम इंडियाचे ते स्वप्न अखेर झाले पुर्ण

मेलबर्न। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात आज(28 डिसेंबर) तिसऱ्या दिवसाशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताने 292 धावांनी आघाडी घेतली आहे.

याबरोबरच विराट कोहलीच्या भारतीय संघाने खास विक्रमही केला आहे. कसोटीमध्ये यावर्षी भारतीय संघाने 250 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे. आत्तापर्यंत भारतीय संघाला कधीही एका वर्षात 250 कसोटी विकेट्स घेण्याचा टप्पा पार करता आला नव्हता.

यावर्षी भारताने 14 कसोटी सामने खेळताना 255 विकेट्स घेतल्या आहेत. याआधी 1979 मध्ये कसोटीत भारताने सर्वाधिक 249 विकेट्स घेतल्या होत्या.

भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्धची सुरु असलेली कसोटी मालिका ही 2018 या वर्षातील 5 वी कसोटी मालिका आहे. या मालिकेत भारताने आत्तापर्यंत 50 विकेट्स घेतल्या आहेत.

जानेवारीमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. या मालिकेत भारताने 60 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर भारताने अफगाणिस्तान विरुद्ध जूनमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला. या सामन्यातही भारतीय गोलंदाजांने सर्व 20 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर भारताने इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली. या मालिकेत भारतीय गोलंदाजांना 85 विकेट्स घेण्यात यश आले होते. या दौऱ्यावरुन परतल्यावर भारतीय संघाने ऑक्टोबरमध्ये विंडीज विरुद्ध मायदेशात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली. या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी 40 विकेट्स घेतल्या.

एका वर्षात भारताने घेतलेल्या सर्वाधिक विकेट्स:

255* विकेट्स – 2018

249 विकेट्स –  1979

241 विकेट्स – 2002

223 विकेट्स – 2008

215 विकेट्स – 2004

214 विकेट्स – 2010

महत्त्वाच्या बातम्या:

कोहलीबरोबरचा हा किस्सा आहे वर्षातील सर्वात्तम, पहा व्हिडीओ

राजकोट बाॅय जड्डू संधी मिळताच टीम इंडियाकडून चमकला

३९ वर्षांपूर्वीच्या विक्रमाला जसप्रीत बुमराहकडून धक्का