भारतीय वनडे संघाचे २४ कर्णधार झाले, पण जे विराटला केले ते कुणालाही जमले नाही

नॉटिंगहॅम | भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या वनडेत भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा आणि कुलदीप यादवने चमकदार कामगिरी केली.

याच सामन्यात कर्णधार विराट कोहलीने एक खास विक्रम केला. कर्णधार म्हणून वनडे कारकिर्दीतील पहिल्या ५० सामन्यात ३९ विजय मिळवणारा तो जगातील तिसरा कर्णधार ठरला.

यापुर्वी केवळ क्लाईव्ह लॉईड आणि रिकी पाॅंटिंग या दोन कर्णधारांना ही कामगिरी करता आली आहे. विशेष म्हणजे हे कर्णधार पुढे जाऊन दोन विश्वचषक जिंकले आहेत.

तर आजपर्यंत भारताचे वनडेत २४ कर्णधार झाले आहे. त्यात केवळ ७ खेळाडूंना टीम इंडियाचे ५० सामन्यात नेतृत्व करता आले आहे. यात कोणत्याही कर्णधाराला पहिल्या ५० सामन्यात अशी कामगिरी करता आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

इतिहासात: आम्ही आलोय.. भारताचा क्रिकेटजगताला संदेश.. 

-रोनाल्डो खेळला रियाल मॅद्रिदसाठी; करार केला जुवेंटसबरोबर; फायदा होणार मॅंचेस्टर युनायटेडला

बापरे! फिफा विश्वचषक २०१८च्या बक्षिसाची रक्कम ऐकूण तुम्ही थक्क व्हाल!