माजी कॅप्टन कूल धोनीच्या या विक्रमाला विराटकडून आहे धोका

राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला आहे. हा विजय विराट कोहलीचा कसोटी कर्णधार म्हणून भारतातील 14 वा विजय आहे.

त्यामुळे तो आता भारतात कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी आहे.

धोनीने भारताचे भारतात 30 सामन्यात नेतृत्व करताना 21 विजय मिळवले आहेत. तर विराटने 20 कसोटी सामन्यात भारताचे भारतात नेतृत्व करताना 14 विजय मिळवले आहेत.

हा विक्रम करताना विराटने मोहम्मद अझरुद्दीनच्या कसोटी कर्णधार म्हणून भारतात मिळवलेल्या 13 विजयांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

विराटने आत्तापर्यंत भारताचे एकूण 41 सामन्यात नेतृत्व केले असून यात त्याने 23 विजय मिळवले आहेत. कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीतही 27 विजयांसह एमएस धोनी अव्वल क्रमांकावर आहे.

कसोटी कर्णधार म्हणून मायदेशात सर्वाधिक विजय मिळवणारे भारतीय क्रिकेटपटू-

21 विजय – एमएस धोनी (सामने- 30)

14 विजय – विराट कोहली (सामने- 20 )

13 विजय – मोहम्मद अझरुद्दीन (सामने- 20 )

महत्वाच्या बातम्या-

पदार्पणाच्या सामन्यातच १८ वर्षीय पृथ्वी शाॅला सामनावीर पुरस्कार

कुलदीप यादवचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कहर कारनामा

-टाॅप ५- उद्यापासून सुरु हेत असलेल्या प्रो-कबड्डीमधील मजेशीर आकडेवारी