विकेट्स घेतल्या बुमरहाने, धावा केल्या पुजाराने, विक्रम झाला इशांतच्या नावावर

मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १३७ धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील १५० वा विजय ठरला आहे.

हा सामना भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठी खास ठरला आहे. त्याचा दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया(सेना) या देशांतील मिळून ८ वा विजय ठरला आहे.

त्यामुळे तो दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया(सेना) या चार देशात मिळून खेळाडू म्हणून सर्वाधिक सामन्यात विजय मिळवणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

या यादीत त्याने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या ७ विजयांना मागे टाकले आहे.

याबरोबरच इशांतने यावर्षी कसोटीमध्ये ४१ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच तो यावर्षी सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया(सेना) या देशात खेळाडू म्हणून सर्वाधिक सामन्यात विजय मिळवणारे भारतीय क्रिकेटपटू – 

८ विजय – इशांत शर्मा

७ विजय – सचिन तेंडुलकर

७ विजय – राहुल द्रविड

७ विजय – सुनील गावसकर

७ विजय – व्हीव्हीएस लक्ष्मण

महत्त्वाच्या बातम्या:

पंत फक्त बडबड करत नाही तर हा मोठा इतिहासही घडवतो

ही दोस्ती तुटायची नाय! शमी -बुमराहची कहानी, सगळ्यांमध्ये अनोखी

कर्णधार कोहली आणि नाणेफेकीच नातं जगावेगळं