अंतिम फेरीत प्रवेश करत भारतीय संघाने केला हा मोठा विक्रम

कोलंबो। काल आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारतीय संघाने तिरंगी टी २० मालिकेत बांग्लादेशवर १७ धावांनी मात केली. या विजयाबरोबरच भारताने आंतराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये एक खास विक्रम रचला आहे.

भारताचा कालचा विजय हा आंतराष्ट्रीय टी २० मधील ६० वा विजय होता. त्यामुळे भारताने आता आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची बरोबरी केली आहे.

या यादीत प्रथम क्रमांकावर पाकिस्तान असून त्यांनी त्यांनी आजपर्यंत ७४ आंतराष्ट्रीय टी २० सामने जिंकले आहेत. तसेच भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर ५४ विजयांसह न्यूझीलंड आणि श्रीलंका आहे.

भारताने काल सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचे अर्धशतक आणि वॉशिंग्टन सुंदरने घेतलेल्या ३ विकेट्सच्या जोरावर बांग्लादेशवर विजय मिळवला.

आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे संघ:

७४ – पाकिस्तान
६० – दक्षिण आफ्रिका आणि भारत
५४ – न्यूझीलंड आणि श्रीलंका