१७ वर्ष जुना अँब्रोस-वॉल्श जोडीचा हा गोलंदाजी विक्रम आज मोडला

पर्थ । ॲशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लडच्या जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड जोडीने एकत्र खेळताना १०० सामन्यात ७६३ विकेट्स घेतल्या आहेत. दोन वेगवान गोलंदाजांनी एकत्र खेळताना घेतलेल्या या सर्वाधिक विकेट्स आहेत.

यापूर्वी हा विक्रम विंडीजच्या महान कोर्टनी वॉल्श आणि कर्टली एम्ब्रोस या जोडीच्या नावावर होता. त्यांनी ९५ कसोटी सामने एकत्र खेळताना ७६२ विकेट्स घेतल्या होत्या.

जागतिक क्रिकेटमध्ये दोन गोलंदाजांनी एकत्र खेळताना सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा ग्लेन मॅकग्रा आणि वॉर्नने यांच्या नावावर आहे. त्यांनी १०४ कसोटीत १००१ विकेट घेतल्या आहेत.

दोन गोलंदाजांनी एकत्र खेळताना घेतलेल्या विकेट्स
१००१- ग्लेन मॅकग्रा- शेन वॉर्न (१०४ कसोटी)
८९५-चामिंडा वास-मुथय्या मुरलीधरन (९५ कसोटी)
७६३- जेम्स अँडरसन- स्टुअर्ट ब्रॉड (१०० कसोटी)
७६२- कोर्टनी वॉल्श – कर्टली एम्ब्रोस (९५ कसोटी)