जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत. सलामीवीर मुरली विजय ० तर केएल राहुल ८ धावांवर बाद झाले आहेत.

या दोनही सलामीवीरांना जेम्स अॅंडरसनने बाद केले आहे.

याबरोबर अॅंडरसनने एक खास विक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानांवर ३५० विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज बनला आहे.

त्याने इंग्लंडमध्ये ८० कसोटीत हा कारनामा करताना सामन्यात २० वेळा ५ तर ३ वेळा १० विकेट्स घेतल्या आहेत. घरच्या मैदानावर ८० कसोटी सामने खेळणारा तो जगातील पहिला पुर्णवेळ गोलंदाज आहे.

अॅंडरसनने कारकिर्दीतील ५४६ पैकी ३५० विकेट्स इंग्लंडमध्ये घेतल्या आहेत.

यापुर्वी कसोटीत घरच्या मैदानावर मुथय्या मुरलीधरनने ७३ सामन्यात ४९३ तर अनिल कुंबळेने ६३ सामन्यात ३५० विकेट्स घेतल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अनुष्का शर्मा टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्यामागे हे आहे खरे कारण

सौरव गांगुली म्हणतो, हे केल्यास आर अश्विनची ताकद आणखी वाढणार

-आयसीसीने घेतला महत्त्वाचा निर्णय, टी-२० क्रिकेट येणार धोक्यात!