मॅंचेस्टर युनायटेडच्या मॅनेजरला कर बुडविल्याने तुरूंगवासाची शिक्षा

मॅंचेस्टर युनायटेडचे मॅनेजर जोसे मौरिन्हो यांना स्पॅनिश कोर्टने कर चुकवल्याने एका वर्षाचा तुरूंगवास आणि १.७८ मिलियन पौंडचा दंड ठोठावला आहे. मौरिन्हो यांनी ही शिक्षा मान्य केली आहे.

मौरिन्हो यांनी २०११ आणि २०१२ मध्ये एकूण ३.३ मिलियन पौंडचा कर बूडवला आहे, असे स्पॅनिश कर अधिकाऱ्यांनी सांगितले. यादरम्यान मौरिन्हो हे रियल माद्रीदचे मॅनेजर होते. तसेच २०१३मध्ये ते इंग्लिश क्लब चेल्सीकडे गेले. तर २०१६ पासून ते युनायटेडचे मॅनेजर आहे.

२०१४मध्ये मौरिन्हो यांची चौकशी केली असता असे पुढे आले की, त्यांनी अर्धवटच माहिती दिली होती. तसेच तेव्हा त्यांनी १.१५ मिलियन पौंडचा दंड देखील भरला होता.

स्पॅनिशच्या कायद्यानुसार, पहिल्या गुन्ह्यातील दोन वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा तुंरूगात न जाता बाहेरून उमेदवार म्हणून पूर्ण केली जाते.

मौरिन्हो प्रमाणेच जुवेंटस स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोलाही या वर्षी १८.८ मिलियन युरोचा दंड झाला होता. तसेच २०१७मध्ये बार्सिलोनाचा लियोनल मेस्सीने २५२,००० युरोचा दंड भरला आहे. त्याला २१ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

ला लीगामध्ये मेस्सीने केला एक खास विक्रम…

युएस ओपन: दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला पराभवाचा धक्का

फिफा २०१८च्या ‘मेन्स बेस्ट प्लेयर’ अवॉर्डमध्ये मेस्सीचे नाव नाही!