४थ्या सत्यम व्हेकेशन्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत एम्फसिस,  सॉफ्टहार्ड ऑटोमेशन  संघांची आगेकूच 

पुणे ।  व्हेकेशन्स यांच्या तर्फे आयोजित ४थ्या सत्यम व्हेकेशन्स कॉर्पोरेट टी-२०क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत एम्फसिस  व  सॉफ्टहार्ड ऑटोमेशन या संघांनी अनुक्रमे इक्लर्क्स व किर्लोस्कर ब्रदर्स संघांचा पराभव करून आगेकूच केली.  

पूना क्लब क्रिकेट मैदान आणि लिजेंड्स क्रिकेट मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात रिझवान खान(५७धावा)  याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर एम्फसिस संघाने इक्लर्क्स संघाचा ३४धावांनी पराभव केला. 

प्रथम फलंदाजी करताना रिझवान खान ५७, अभिजित कुमार नाबाद ३४ यांनी केलेल्या धावांच्या जोरावर एम्फसिस संघाने २०षटकात ५बाद १४६धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना  इक्लर्क्स संघाला २० षटकात ८बाद ११३धावाच करता आल्या. 

यात केतन भेडसगावकर ३७, राहुल नाईक २१यांनी थोडासा प्रतिकार केला.एम्फसिसकडून आनंद राय(३-१२), ऋषी नेगी(३-१९)यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.सामन्याचा मानकरी रिझवान खान ठरला. 

दुसऱ्या सामन्यात अभिजित जगताप याच्या उपयुक्त ४७धावांच्या खेळीच्या जोरावर  सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने किर्लोस्कर ब्रदर्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला.     

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 

एम्फसिस: २०षटकात ५बाद १४६धावा(रिझवान खान ५७(४३), अभिजित कुमार नाबाद ३४(३०), राहुल नाईक २-२५)वि.वि.इक्लर्क्स:२० षटकात ८बाद ११३धावा(केतन भेडसगावकर ३७(३२), राहुल नाईक २१(१८), आनंद राय ३-१२, ऋषी नेगी ३-१९);सामनावीर-रिझवान खान;  एम्फसिस ३४धावांनी विजयी;

किर्लोस्कर ब्रदर्स: २०षटकात ८बाद १३२धावा(सचिन उबाळे ५६(५१), प्रफुल मानकर ४-२२)पराभूत वि.सॉफ्टहार्ड ऑटोमेशन: १८.३षटकात ५बाद १३३धावा(अभिजित जगताप ४७(३९), प्रफुल मानकर नाबाद ३७(२५), चिंतन शहा २-२७);सामनावीर-अभिजित जगताप;  सॉफ्टहार्ड ऑटोमेशन ५ गडी राखून विजयी.