एमआरएफ एफएमएससीआय आयएनआरसी 2018 तिसरी फेरी: रॅली ऑफ अरुणाचलसाठी गौरव गिल सज्ज 

इटानगर: भारताचा आघाडीचा चालक गौरव गिल हा  एमआरएफ एफएमएससीआय आयएनआरसी 2018 तिसरी फेरीतील रॅली अरुणाचलसाठी सज्ज झाला आहे व या फेरीतील सहभागामुळे तो आपले सहावे राष्ट्रीय जेतेपद मिळवण्याच्या आणखीन जवळ पोहोचला आहे.
गिलच्या टीम महिंद्रा अ‍ॅडव्हेंचरने दक्षिण डेअर रॅलीचे गेल्याच महिन्यात जेतेपद मिळवले आहे. पुर्ण हंगामात त्याने चमक दाखवण्यासोबतच पहिल्या दोन फेरींमध्ये देखील  विजय मिळवले आहेत. गिल त्याचा सहचालक मुसा शेरीफसोबत यावेळी सुद्धा चमक दाखवण्यासाठी सज्ज असेल. यासोबत त्याचे लक्ष आपला संघसहकारी अमित्रजित घोष ( सह-चालक अश्‍विन नाईक) याचे आव्हान त्याला मिळेल.
 
घोष सध्या दुस-या स्थानी असून दक्षिण डेअर रॅलीमध्ये चमक दाखवता आली नसली तरीही तो मजबूत स्पर्धक आहे. टीम महिंद्रा अ‍ॅडव्हेंचरला आर्का मोटरस्पोर्ट्सच्या कर्ण कदूरचे आव्हान असणार आहे. कदूर हा पीव्हीएस मुर्थीसह आयएनआरसी 2 गटात तो आघाडीवर आहे. तर, संपुर्ण चॅम्पियनशिपमध्ये गिल व घोषच्या मागे आहे.
त्याचा संघ सहकारी राहुल कांथराज (सह चालक विविक वाय भट) हा देखील मजबूत दावेदार समजला जात आहे. सध्या आयएनआरसी 2 गटात तो दुस-या स्थानावर आहे. अरूर विक्रम राव (सह चालक सोमय्या ए जी) हा आयएनआरसी 3 गटात आघाडीवर आहे आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आपली आघाडी आणखीन भक्कम करण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे.
दुस-या फेरीनंतर चॅम्पियनशिप गुणतालिका 
 आयएनआरसी : 1) गौरव गिल व मुसा शेरीफ ( टीम महिंद्रा अ‍ॅडव्हेंचर) 50 गुण,2) अमित्रजित घोष व अश्‍विन नाईक (टीम महिंद्रा अ‍ॅडव्हेंचर) 36 गुण, 3) कर्ण कदूर व पीव्हीएस मुर्थी ( आर्का मोटरस्पोर्ट्स ) 30 गुण
 
– आयएनआरसी 1 : 1) गौरव गिल व मुसा शेरीफ ( टीम महिंद्रा अ‍ॅडव्हेंचर) 50, 
अमित्रजित घोष व अश्‍विन नाईक (टीम महिंद्रा अ‍ॅडव्हेंचर) 36 गुण
 
– आयएनआरसी 2 : 1)कर्ण कदूर व पीव्हीएस मुर्थी ( आर्का मोटरस्पोर्ट्स ) 50 गुण, 2) राहुल कांथराज व विवेक वाय भट ( आर्का मोटरस्पोर्ट्स ) 36 गुण, 3) जेकब के जे व नीतीन जेकब 24 गुण 
 
– आयएनआरसी 3 : 1) अरूर विक्रम राव व सोमय्या ए जी  50 गुण, 2) सुहेम कबीर आणि जीवारथिनाम 30 गुण 3) डिन मॅस्के-हेनस व श्रुप्था पाडीवाल 28 गुण