Video: एमएस धोनीने विराटला दिलेल्या बर्थडेच्या शुभेच्छा नक्की पहा

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज(5 नोव्हेंबर) 30 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतीय संघातील खेळाडूंनीही विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.

याचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे. या व्हिडिओतून भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने विराटला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

धोनीने शुभेच्छा देताना विराटचा बंदूक हातात घेतलेला लहानपणीचा फोटो दाखवला आहे आणि म्हटले आहे की हा फोटो सिद्ध करतो की विराट तू PUBG या मोबाईल गेमचा मोठा चाहता आहे. तसेच धोनीने विराटला एक गमतीशीर सल्ला देखील दिला आहे. धोनीने विराटला सांगितले की  PUBG हा मोबाईल गेम मनिष पांडेलाही शिकवं

धोनीबरोबरच या व्हिडिओतून रविंद्र जडेजा, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, शिखर धवन, दिनेश कार्तिक, रिषभ पंत अशा भारतीय खेळाडूंनीही विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.

विराटला सध्या विंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

जे कोणत्याही कर्णधाराला जमले नाही ते रोहित शर्माने करुन दाखवले

पहिल्या टी२० सामन्यात टीम इंडियाचा विंडिजवर ५ विकेट्सने विजय

मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू ठरला कृणाल पंड्याची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट; घडला हा विलक्षण योगायोग