धोनीची मुलगी झिवाबद्दल काय म्हणाले अनुपम खेर

अनुपम खेर त्यांच्या ‘रांची डायरी’ प्रोजेक्टच्या निमित्ताने रांचीमध्ये आहेत. त्यादरम्यान त्यांनी एम.एस.धोनीच्या घरी भेट दिली.  यावेळी ते धोनीची मुलगी झिवालाही भेटले त्याबद्दल ट्विटरवर त्यांनी पोस्ट करून धोनीच्या चाहत्यांना खुश केले.

ते ट्विटरवर म्हणाले की “साक्षी आणि एम.एस. धोनीची मुलगी झिवा हुशार आणि मनोरंजक आहे. ती खरंच आपल्या राष्ट्रगीतासह अनेक गाणी मोठ्याने म्हणू शकते.”

तसेच त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये साक्षी आणि एम एस धोनी यांचे आदरातिथ्याबद्दल आभार मानताना त्यांनी धोनीच्या वडिलांच्या बरोबरच फोटो पोस्ट करून लिहिले आहे आहे की “साक्षी आणि एम एस धोनी, तुमच्या प्रेमळपणा आणि आदरातिथ्याबद्दल धन्यवाद. तुमचं नवीन घर आवडलं. पालकांना भेटणे नेहमीच आनंददायक असते.”

अनुपम खेर यांनी मागीलवर्षी धोनीच्या जीवनावर आलेल्या ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटात धोनीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.