‘ती’ एक धाव एमएस धोनीसाठी ठरणार खास…

सिडनी। शनिवारी(12 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिला वनडे सामना होणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील हा पहिला सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7.50 मिनिटांनी सुरु होणार आहे.

या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीला एक खास विक्रम करण्याची संधी आहे. धोनीने भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये 9999 धावा केल्या आहेत. तो वनडेमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा पाचव्या क्रमांकाचा खेळाडू आहे.

भारताकडून याआधी 10 हजार धावांचा टप्पा सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि विराट कोहलीने पार केला आहे. त्यामुळे धोनीला भारताकडून 10 धावा करणारा पाचवा खेळाडू बनण्याची संधी आहे.

धोनीने भारताकडून आत्तापर्यंत 329 सामन्यात 49.74 च्या सरासरीने 9999 धावा केल्या आहेत. यात त्याने 9 शतके आणि 67 अर्धशतके केली आहेत.

तसेच धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 331 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील 3 वनडे सामने हे आशियाई एकादश संघाकडून खेळला आहे. या तीन सामन्यात मिळून त्याने 174 धावा केल्या आहेत.

त्यामुळे याआधीच त्याने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. पण भारताकडून अजून त्याला हा टप्पा गाठण्यासाठी 1 धावेची गरज आहे.

भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू-

18426 धावा – सचिन तेंडुलकर (463 सामने)

11221 धावा – सौरव गांगुली (308 सामने)

10768 धावा – राहुल द्रविड (340 सामने)

10232 धावा – विराट कोहली (216 सामने)

9999 धावा – एमएस धोनी (329 सामने)

महत्त्वाच्या बातम्या-

विराटने सांगितल्या निवृत्तीनंतरच्या योजना, ही आवडती गोष्ट तर बिलकूल नाही करणार!

केएल राहुल, हार्दिक पंड्याच्या अडचणी वाढल्या, मायदेशी परतण्याचे आदेश…

टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा अंतिम ११ जणांचा संघ