पहा: ३६वर्षीय धोनी आणि २४वर्षीय हार्दिक पंड्यामध्ये कोण जिंकलं शर्यत

मोहाली। बीसीसीआयने आज ट्विटरवरून भारतीय यष्टीरक्षक फलंदाज एम एस धोनी आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांच्यातील १०० मीटर धावण्याच्या शर्यतीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

यात ३६ वर्षीय धोनी त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असणाऱ्या पंड्याला भारी पडला आहे आणि त्याने ही शर्यत जिंकली आहे. या व्हिडिओत असे दिसून येत आहे की या दोघांमध्ये झालेली ही शर्यंत गमातीचा भाग होता.तसेच धोनीचा फिटनेस हा आत्ताच्या तरुण खेळाडूं इतकाच चांगला आहे. असेच यातून दिसून आले.

याआधीही धोनी, विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्यातील शर्यतीचा व्हिडीओ वायरल झाला होता. यातही धोनी आणि विराट यांचा उत्तम फिटनेस दिसून आला होता.

आज मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आय एस बिंद्रा स्टडीयमवर भारत आणि श्रीलंका संघात दुसरा वनडे सामना रंगणार आहे. हा सामना सुरु होण्याआधीचा हा व्हिडीओ आहे.

भारतीय संघ या वनडे मालिकेत १-०ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आज सामना जिंकून मालिका बरोबरीत करण्याचा प्रयत्न असेल तर श्रीलंका संघही मालिका जिंकण्याच्या हेतूने हा सामना खेळेल.