धोनी म्हणतो, दहा वर्षानंतर पुन्हा जाग्या झाल्या या क्षणाच्या आठवणी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नुकतेच इंग्लंड दौऱ्यातील टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळून भारतात परतला आहे.

सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत असल्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीला जवळपास दोन महिन्यांची सुट्टी मिळली आहे.

कायमच आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे आपल्या खाजगी आयुष्याला  धोनीला खूप कमी वेळ मिळतो. मात्र इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेमुळे धोनी सुट्टीचा मनमुराद आनंद लुटतोय.

धोनीने केलेले एक ट्विट आणि इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

“रांचीतील या धबधब्यामुळे दहा वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.” असे धोनी त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. तसेच धोनीने ट्विटमध्ये इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडिओची लिंकही दिली आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनी धबधब्याखाली उभे राहून, पाण्याशी खेळत असल्याचे दिसत आहे.

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत १५ सप्टेंबर पासून सहभागी होणार आहे. त्यामुळे धोनीकडे कुटूंब आणि मित्रांबरोबर वेळ घालवण्यासाठी जवळपास आणखी एक महिना शिल्लक आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-रियल माद्रिद सोडण्याविषयी रोनाल्डोने दिले स्पष्टीकरण

-दिग्गज माजी गोलंदाजाची इंशांत शर्मावर स्तुतीसुमने