धोनीचा पुन्हा एकदा मोठा कारनामा, केला हा विक्रम !

पुणे। भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एम एस धोनीने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतात २०० झेल घेण्याचा विक्रम केला आहे.असे करणारा तो पहिला यष्टीरक्षक ठरला आहे.

हा विक्रम त्याने पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर न्यूझीलंड विरुद्ध खेळताना भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर मार्टिन गप्टिलचा झेल घेताना केला. या सामन्यात धोनीने हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर रॉस टेलरचाही झेल घेतला.

असा विक्रम करणारा तो जगातील ३ रा यष्टीरक्षक ठरला आहे. याआधी श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुमार संगकाराने आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक अॅलेक स्टीवर्ट यांनी आपापल्या देशात हा विक्रम केला आहे.

तसेच सगळ्यात जास्त झेल घेण्याच्या यादीत धोनी ४ थ्या क्रमांकावर आहे. यात ऑस्ट्रेलियाचा ऍडम गिलग्रिस्ट ४१७ झेलांसह अव्वल स्थानी, मार्क ब्राऊचर ४०२ झेलांसहित दुसऱ्या स्थानी तर संगकाराचे ३८३ झेल आहेत, तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

धोनी सध्या न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत व्यस्त आहे. भारतीय संघ परवा न्यूझीलंड विरुद्ध ३रा वनडे सामना कानपूरला खेळणार आहे.