- Advertisement -

धोनीने धावा केल्या १०, परंतु यष्टिरक्षणात केला विश्वविक्रम

0 569

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक एमएस धोनीकडून आज एक खास विक्रम झाला. वनडेत यष्टींमागे ४०० विकेट्स घेणारा धोनी चौथा खेळाडू बनला आहे. धोनीने जेव्हा विजेच्या चपळाईने १७व्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या एडिन मार्करमला यष्टिचित केले तेव्हा तो धोनीचा वनडेतील ४००वी शिकार ठरला. 

धोनीने ३१५ सामन्यात आजपर्यंत ४०० खेळाडूंना यष्टींमागे बाद केले आहे. या यादीत अव्वल स्थानी कुमार संगकारा असून त्याने ४०४ सामन्यात ४८२ खेळाडूंना बाद केले आहे तर दुसऱ्या स्थानावरील ऍडम गिलख्रिस्टने २८७ सामन्यात ४७२ फलंदाजांना तर तिसऱ्या क्रमांकावरील मार्क बाऊचरने २९५ सामन्यात ४२४ फलंदाजांना बाद केले आहे.

धोनीने ३९८ मधील २९४ झेल घेतले असून १०६ फलंदाजांना यष्टिचित केले आहे. यष्टिचित करण्यात धोनी अव्वल असून तो सोडून आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला ९९ पेक्षा जास्त खेळाडूंना यष्टिचित करता आले नाही.

भारतीय खेळाडूंमध्ये या यादीत दुसऱ्या क्रमांकावर नयन मोंगिया असून त्याने १४० सामन्यात यष्टींमागे १५४ विकेट्स घेतल्या आहेत.

Comments
Loading...
%d bloggers like this: