धोनीवर शंका घेणाऱ्यांना ही आकडेवारीच देते उत्तर

कोलकाता | गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये कोलकाताने ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. हा विजय कोलकाताला गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी घेऊन गेला.

या सामन्यात २विकेट्स आणि ३२ धावा करणाऱ्या सुनिल नारायणला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

असे असले तरीही या सामन्यात दोन खेळाडूंची खुपच चर्चा झाली. एक म्हणजे एमएस धोनी तर दुसरा आहे शुभमन गिल.

धोनीने कालच्या सामन्यात २५ चेंडूत ४३ धावांची तुफानी फटकेबाजी केली. त्यात ४ षटकार आणि १ चौकाराचा समावेश होता.

त्यामुळे या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या स्थानी आला. याबरोबर त्याने काही अचंबित करणारे विक्रमही केले. 

-९ सामन्यात धोनीने ८२.२५च्या सरासरीने ३२९ धावा केल्या आहेत.

-३२९ धावा करताना त्याने १६९.५९चा जबरदस्त स्ट्राईकरेट राखला आहे.

-तब्बल २४ षटकार खेचत त्याने या आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

-धोनीने आयपीएलमध्ये केवळ दोन वेळा ४०० धावांचा टप्पा पार केला आहे. यावेळी त्याला पुन्हा अशी कामगिरी करण्याची संधी

-गेल्या ७ सामन्यात धोनी केवळ दोन वेळा बाद झाला आहे.

-तीन आयपीएल हंगामात २३ पेक्षा जास्त षटकार मारणारा धोनी पहिलाच कर्णधार (२०११, २०१३ आणि २०१८)

-चेन्नईकडसाठी १५० षटकार मारणारा धोनी हा सुरेश रैनानंतरचा दुसरा खेळाडू

महत्त्वाच्या बातम्या –
Video- ओवरमध्ये जिंकायला हव्या होत्या ५ धावा, घडले असे काही की…

पहा व्हिडीवो- बर्थडेचं यापेक्षा चांगले सरप्राईज असुच शकत नाही!

कोहलीपेक्षा मी लांब षटकार मारतो, मग कशाला कमी खायचं!

अफगाणिस्तान भारताविरुद्ध खेळणार आहे, विराट कोहली विरुद्ध नाही

बेंगलोर चाहत्यांसाठी गुड न्युज, सीएसकेची धुलाई करण्यासाठी हा खेळाडू सज्ज

सगळ्यांनी माघार घेतली असताना हा देश करणार पाकिस्तानचा दौरा?