एम एस धोनीने केला हा मोठा विक्रम

धरमशाला। येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील पहिल्या वनडेत भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६००० धावा पूर्ण करणारा तो श्रीलंकेच्या कुमार संगकारा नंतरचा दुसरा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. तसेच भारताकडून १६००० धावा पूर्ण करणारा सहावा फलंदाज बनला आहे.

याआधी भारताकडून अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर,राहुल द्रविड,सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांनी केला आहे.

याबरोबरच धोनीला श्रीलंका विरुद्ध सुरु असलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत वनडेतील १०,००० धावाही पूर्ण करण्याची संधी आहे. त्याच्या ही मालिका सुरु होण्याआधी वनडेत ९८२६ धावा होत्या. त्याला १०,००० धावा पूर्ण करण्यासाठी १७४ धावांची गरज आहे.