धोनीचा आश्चर्यचकित करणारा निर्णय, आता या संघासाठी खेळणार

भारत आणि विंडिज यांच्यातील वन-डे मालिकेला दोन अठवड्यांचा कालावधी उरला आहे. तसेच आगामी आॅस्ट्रेलियाचा दौऱ्य़ासाठी सराव व्हावा म्हणून महेंद्रसिंग धोनी झारखंडच्या संघाकडून विजय हजारे ट्राॅफीत खेळू शकतो.

भारत आणि विंडिज यांच्यातील वन-डे मालिकेला दोन अठवड्यांचा कालावधी उरला आहे. भारतीय संघ सध्या विंडिंजविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मागील काही दिवसांपासून धोनीला धावा काढताना संघर्ष करावा लागत आहे.

धोनीचा गेलेला फाॅर्म परत मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. धोनी झारखंडच्या संघाकडून खेळल्यानंतर झारखंडच्या संघाचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे.

झारखंडचा संघ विजय हजारे ट्राॅफीतील इलाईट ग्रुप सी मध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर आहे. झारखंडचा संघ त्यांचा अंतिम सामना 11 आॅक्टोबरला सेनादल संघाविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 14 आॅक्टोबरपासून उपांत्यपुर्व फेरीचे सामने होणार आहेत.

झारखंडच्या संघ इलाईट ग्रुप सी मध्ये सर्वात वरती आहे. सेनादलविरूद्धचा सामना जिंकल्यानंतर झारखंडच्या संघाचे वरचे स्थान आणखी मजबुत होणार आहे.

एशिया कप स्पर्धेनंतर धोनीने झारखंडसाठी ग्रुप स्तरावर न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामळे धोनी सेनादलविरूद्धच्या अंतिम सामन्यात खेळणार नाही.14 आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या उपांत्यपुर्व फेरीत  मात्र धोनी खेळणार आहे.

”सप्टेंबर महिन्यापासून धोनी झारखंडच्या संघाबरोबर असून तो संघ मार्गदर्शकाच्या भुमिकेत आहे. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे.” असे झारखंड क्रिकेटचे सचिव देबासिश चक्रवर्ती यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-