Video: एमएस धोनीचा देसी बॉइजवर डान्स, पत्नी साक्षीला आवरले नाही हसू !

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा त्याच्या शांत स्वभाव स्वभावासाठी ओळखला जातो. हा खेळाडू त्याच्या क्रिकेटमधील अनेक कौशल्यांसाठीही जगाला माहित आहे. परंतु क्रिकेट सोडून इतर मैदानाबाहेर हा खेळाडू एक सामान्य आणि आनंद घेणारे जीवन जगतो याचा प्रत्यय अनेक वेळा आला आहे.

याचा पुन्हा एकदा अनुभव काल आला जेव्हा धोनीचा एक देसी बॉइज चित्रपटातील गाण्यावर डान्स करतानाचा विडिओ व्हायरल झाला. यातील ‘झक मारके’ या गाण्यावर त्याची पावले जेव्हा थिरकली तेव्हा पत्नी साक्षी धोनीलाही हसू आवरले नाही.

हा विडिओ कधीचा आहे हे नक्की माहित नाही परंतु हा चित्रपट २०१२ या वर्षात प्रदर्शित झाला आहे. यात डान्स केलेल्या जॉन अब्राहाम आणि धोनीची कायम तुलना होत असे. कारण दोघांचेही केस त्यावेळी लांब होते.