अमेरिकेतील त्या चाहत्याने चक्क गाडीच्या नंबर प्लेटवरच लिहले धोनीचे नाव….

भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार असलेल्या एमएस धोनीचे चाहते भारताबरोबर विदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत. अशाच एका अमेरिकेतील चाहत्याने धोनीचे नाव लिहलेली नंबर प्लेट त्याच्या गाडीला लावली आहे.

लॉस एंजेल्समधील या चाहत्याने त्याच्या गाडीच्या नंबर प्लेटवर ‘एमएस धोनी’ हे नाव लिहले आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्या गाडीचा फोटो आणि धोनी आता लॉस एंजेल्समध्येही असे ट्विट करत पोस्ट शेयर केली.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007चा पहिला टी20 विश्वचषक जिंकला आहे. तर 28 वर्षानंतर 2011 मध्ये आयसीसी विश्वचषक पटकावला आहे. तसेच 2013च्या चॅम्पिसन्स ट्रॉफीवरही भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली आपले नाव कोरले आहे.

टी20 आणि वन-डे बरोबरच भारतीय संघ धोनी कर्णधार असताना कसोटी क्रमवारीतही 2009 मध्ये अव्वल स्थानावर आला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

पर्थ खेळपट्टीवरुन भारत-आॅस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंमध्येच झुंपली भांडणे

कोहली-कुंबळे वादाबद्दल भारताच्या या दिग्गज खेळाडूने केला मोठा खूलासा

विराट कोहली सेना कंट्रीजमध्ये कमनशीबीच, नकोसा विक्रम झाला नावे