धोनी चाहत्यांसाठी ही आहे महत्त्वाची आकडेवारी

 

बेंगलोर | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार कर्णधार एमएस धोनीने काल आपल्या संघाला आयपीएलमध्ये एकहाती सामना जिंकून दिला. अगदी शेवटपर्यंत मैदानावर रहात त्याने षटकार खेचून विजय साकारला. 

शेवटच्या चेंडूवर षटकार मारत विजय मिळवून देणे ही धोनीची खासियत समजली जाते.  धावांचा पाठलाग करताना त्याने हा कारनामा अनेक वेळा केला आहे. 

त्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून त्याने २१ वेळा षटकार खेचत सामना संपवला आहे.

यात वनडेत ९वेळा, आयपीएलमध्ये ४वेळा, आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ३ वेळा, चॅंपियन्स लीगमध्ये २ वेळा, देशांतर्गत क्रिकेटमध्ये २वेळा तर कसोटी क्रिकेटमध्ये एकदा असे त्याने तब्बल २१ वेळा षटकार खेचत सामना संपवला आहे. 

धोनीच्या याच कामगिरीच्या जोरावर काल चेन्नईने शेवटच्या ६ षटकांत तब्बल ८१ धावा केल्या. 

महत्त्वाच्या बातम्या –

-अबब! पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप 

-संपूर्ण वेळापत्रक: असे होतील भारताचे विश्वचषक 2019चे सामने 

-यारे या सारे या! आता १०४ देश खेळणार आंतरराष्ट्रीय टी२० सामने 

-ना धोनी- ना विराट, आयपीएलमध्ये हवा तर याच खेळाडूची 

-धोनी चाहत्यांसाठी ही आहे महत्त्वाची आकडेवारी 

-या कारणामुळे विराटला झाला 12 लाख रूपयांचा दंड 

-बीसीसीआयची फसवणूक करणारा खेळाडू आयपीएलमध्ये चमकला

-पराभव झाला तरीही हा विक्रम करत कोहली भाव खाऊन गेला 

-असा एक कारनामा ज्यासाठी टी२०मध्ये खेळाडू करतात जिवाचे रान