धोनीबद्दल जी गोष्ट ८० टी२० सामन्यात घडली नाही ती काल घडली !

गुवाहाटी । स्टंप्स पाठीमागे जगात जर कुणाची मक्तेदारी असेल तर एकच नाव घेतलं जात ते म्हणजे एमएस धोनी. त्याची यष्टिरक्षणची अपारंपरिक शैली ही चाहत्यांसाठी खास असते. सतत गोलंदाजाशी संवाद ठेवून हा खेळाडू दिग्गजांना तंबूचा रस्ता दाखवतो. परंतु हीच धोनीची पद्धत काल धोनीवर उलटली.

धोनी आजपर्यत ८० टी२० सामने खेळला आहे. या ८० सामन्यात काल प्रथमच तो यष्टिचित झाला. याचे संपूर्ण श्रेय गोलंदाज ऍडम झॅम्पा आणि यष्टीरक्षक टीम पेनला जाते.

धोनी ज्या चेंडूवर आऊट झाला त्याच्या आधीच्या चेंडूही बऱ्यापैकी तसाच होता परंतु धोनीने चतुराई दाखवत पाठीमागे गेला. परंतु पुढच्याच चेंडूवर धोनी पुढे आला. ऍडम झाम्पाचा चेंडू बऱ्यापैकी फिरकी घेत धोनीपासून दूरवरून यष्टीरक्षक टीम पेनच्या हातात गेला आणि क्षणाचाही विलंब न लावता पेनने धोनीला यष्टिचित केले.

ऐकून आपण आश्चर्यचकित व्हाल परंतु ३०६ वनडेत धोनी केवळ एकदा यष्टिचित झाला आहे. विंडीजविरुद्ध २०११ च्या विश्वचषकात तो यष्टिचित झाला होता. धोनी यापूर्वी २०११ साली शेवटचा यष्टिचित झाला होता.

धोनी आजपर्यत केवळ ५वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टिचित झाला आहे-टी२०- ऑस्ट्रेलिया २०१७
वनडे- विंडीज २०११
कसोटी- पाकिस्तान- २००६, दक्षिण आफ्रिका- २००८ आणि बांगलादेश-२०१०