पहिल्या सराव सामन्यात यष्टीरक्षक नाही तर क्षेत्रकक्षक झाला धोनी, पहा व्हिडिओ

शनिवारी(25 मे) भारताचा विश्वचषक 2019 मधील पहिला सराव सामना न्यूझीलंड विरुद्ध द ओव्हल मैदानावर पार पडला. या सामन्यात भारताला न्यूझीलंडने 6 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 180 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य न्यूझीलंडने 37.1 षटकात सहज पार केले.

या सामन्यात न्यूझीलंडचा संघ धावांचा पाठलाग करत असताना भारताचा नियमित यष्टीरक्षक एमएस धोनी मैदानात क्षेत्ररक्षण नाही तर चक्क क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरला होता. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारताकडून या सामन्यात धोनी ऐवजी दिनेश कार्तिकने यष्टीरक्षण केले. ज्यावेळी न्यूझीलंडचा संघ फलंदाजीसाठी मैदानात आला होता. त्यावेळी सुरुवातीला धोनी मैदानात आला नव्हता. पण त्यानंतर काही वेळाने तो मैदानात आला. पण त्याने यष्टीरक्षण न करता डिप फाईन लेगला क्षेत्ररक्षण केले. यावेळी त्याला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहनही मिळाले.

या सामन्यात धोनीसह अन्य भारतीय फलंदाजांना फलंदाजीत मात्र खास काही करता आले नाही. फक्त रविंद्र जडेजाने भारताकडून एकाकी झूंज देत 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच हार्दिक पंड्याने 30 धावांची छोटेखानी खेळी केली.

या दोघांव्यतिरिक्त विराट कोहली(18), एमएस धोनी(17) आणि कुलदीप यादव(19) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली.

न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स निशामने तीन तर टिम साऊथी, कॉलीन डि ग्रँडहोम आणि लॉकी फर्ग्यूसनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

प्रेक्षकांनी उडवलेल्या खिल्लीबद्दल शतकवीर स्टिव्ह स्मिथ म्हणाला…

काय सांगता! चक्क इंग्लंडचा प्रशिक्षकच खेळाडू म्हणून उतरला मैदानात

जडेजाच्या अर्धशतकानंतर चाहत्यांनी केले असे जोरदार सेलिब्रेशन, पहा व्हि़डिओ