चेन्नई सुपर किंग्जच्या अँथम साँगवर धोनी, केदार, हरभजनने धरला ठेका, पहा व्हिडिओ

आयपीएलचा 12 मोसम येत्या शनिवारपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आता सर्वच संघ आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. तसेच सर्वच संघांच्या सोशल मीडिया अकाउंटवर विविध पोस्ट पहायला मिळत आहेत.

असाच एक व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनी, मुरली विजय, केदार जाधव आणि हरभजन सिंग डान्स करताना दिसले आहेत. त्यांनी चेन्नई संघाच्या अँथम साँगवर ठेका धरला आहे.

या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, ‘हे गाणे आणि पिवळ्या जर्सीतील खेळाडू, सर्वोत्तम #Yellove गोष्ट आहे.’

चेन्नई सुपर किंग्जचा संघ एमए चिदम्बरम स्टेडियमवर सराव करत आहे. त्यांचा पहिला सामना 23 मार्चला विराट कोहली कर्णधार असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध होणार आहे.

चेन्नईच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर सरावादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे. यातील एका व्हिडिओमध्ये धोनी मोठे फटके मारतानाही दिसला आहे.

चेन्नईने आत्तापर्यंत 2010,2011 आणि 2018 असे तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. ते यावर्षीही विजेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न करतील.

महत्त्वाच्या बातम्या-

कॅप्टनकूल एमएस धोनीने वाचवले या भारतीय गोलंदाजाचे करियर…

या कारणामुळे रिषभ पंत म्हणतो, माझी धोनीबरोबर तुलना नको…

…म्हणून विजेतेपद मिळवण्यास रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला आले अपयश, कोहलीने केले स्पष्ट