या वर्षी धोनी ठरला सर्वात विश्वासार्ह्य खेळाडू

भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी या वर्षीचा भारताचा सर्वात विश्वसार्ह्य खेळाडू ठरला आहे. त्याने या वर्षी ५ वेळा ‘जनबँकेबल प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकला आहे. या वर्षी सर्वाधिक वेळा हा पुरस्कार धोनीने जिंकला आहे.

या सामन्यांमध्ये मिळाला धोनीला जनबँकेबल प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार

भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरा वनडे सामना,
धोनीची सामन्यातील कामगिरी: १२२ चेंडूत १३४ धावा

भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा टी २० सामना,
धोनीची सामन्यातील कामगिरी: ३६ चेंडूत ५६ धावा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिला वनडे सामना,
धोनीची सामन्यातील कामगिरी: ८८ चेंडूत ७९ धावा

भारत विरुद्ध श्रीलंका, पहिला वनडे सामना,
धोनीची सामन्यातील कामगिरी: ८७ चेंडूत ६५ धावा

भारत विरुद्ध श्रीलंका, पहिला टी २० सामना,
धोनीची सामन्यातील कामगिरी: २२ चेंडूत नाबाद ३९ धावा

काय आहे जनबँकेबल प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार

जो खेळाडू संघाला गरज असताना चांगली कामगिरी करतो, आणि त्याच्या कामगिरीमुळे संघाला विजय मिळवण्यात मदत होते त्याला हा पुरस्कार दिला जातो. दोन्ही प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंमधून एकाला हा पुरस्कार दिला जातो.

हा पुरस्कार कोणाला द्यायचा हे लोकांनी दिलेल्या मतांनुसार आणि समालोचकांच्या विश्लेषणाच्या आधारावर दिला जातो.

काय फरक आहे सामनावीर पुरस्कार आणि जनबँकेबल प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारांमध्ये

सामनावीराचा पुरस्कार हा सामन्यात सर्वात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूला दिला जातो तर जनबँकेबल प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार ज्या खेळाडूवर संघ अवलंबून असतो आणि त्याची कामगीरी संघाला मदत करणारी असते त्याला दिला जातो.

या पुरस्कारात खेळाडूला काही रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.