पहिल्या वनडेसाठी तो खेळाडू सर्वात आधी पोहचला चेन्नईमध्ये

चेन्नई । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ५वनडे सामन्यांची मालिका येत्या १७ तारखेपासून अर्थात रविवारपासून येथे सुरु होत आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर विश्रांती घेऊन खेळाडू पुन्हा व्यावसायिक क्रिकेटला सुरुवात करत आहेत.

भारतीय संघ पुढील काही महिने भरपूर मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहे. त्यामुळे खेळाडूंनी आपल्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालण्याला पसंती दिली. विराट कोहलीने आपल्या कमर्शियल कंमिटमेन्ट अर्थात जाहिरात शूट करून घेतले.

या सामन्यासाठी खेळाडू आता चेन्नईमध्ये परतु लागले आहेत. sportstarlive.com प्रमाणे भारतीय खेळाडूंमध्ये एमएस धोनी हा बुधवारीच येथे पोहचला आहे. बाकी खेळाडू गुरुवारी येऊन शुक्रवारी सराव करणार आहेत.

ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या सराव सामन्यानंतर विश्रांती घेण्याला प्राधान्य दिले. ते गुरुवारपासून सराव करतील.

यदाकदाचित आपल्याला माहित नसेल तर-

धोनी आणि चेन्नई शहराचे विशेष नाते आहे. धोनीचा मोठा चाहतावर्ग या शहरात आहे. तब्बल ८ आयपीएल मोसमात धोनीने चेन्नई संघाचे नेतृत्व केले आहे. त्याला येथे थाला म्हणून ओळखले जाते. भारतात एखाद्या खेळाडूला त्याच्या स्वतःच्या शहरापेक्षा जास्त चाहतावर्ग असलेला धोनी कदाचित पहिलाच खेळाडू असेल.

https://twitter.com/kumbakonamtalks/status/908275265469427712