भारताचे विश्वचषक विजेते कर्णधार जाहिरात शूटसाठी एकत्र !

कोलकाता। एका जाहिरातीच्या शूटसाठी काल भारताचे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव आणि एमएस धोनी ईडन गार्डन स्टेडिअमवर एकत्र आले होते.

यावेळी धोनीने सकाळच्या सत्रात ईडन गार्डनची खेळपट्टी बघितली आणि क्युरेटर सुजाण मुखर्जी यांच्याशी चर्चा केली. भारतीय संघ श्रीलंका संघाविरुद्ध १६ नोव्हेंबरला ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळणार आहे.

या खेळपट्टीचे क्युरेटर मुखर्जी धोनी बद्दल बोलताना म्हणाले, ” धोनीचे खेळपट्टीचा तयारीविषयी कौतुक केले तसेच आम्हाला कसोटी सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.”

ईडन गार्डनवर शूट झालेल्या या जाहिरातीचे दिग्दर्शन बंगालचे निर्माते आणि दिग्दर्शक अरिंदम सील यांनी केले आहे. या जाहिरातीत धोनी आणि कपिल यांनी जाहिरातीच्या आवश्यकतेनुसार एकमेकांविरुद्ध फलंदाजी आणि गोलंदाजी केली. या जाहिरातीत तेथील लाहान मुलांनाही घेण्यात आले आहे.

अरिंदम सील यांनी या आधी अनेक चित्रपट मालिकेमध्ये काम केले आहे. त्यांनी सांगितले त्यांच्या आयुष्यातील हा एक कायम लक्ष्यात राहील असा अनुभव होता. त्याच बरोबर ते भाग्यवान आहेत की त्यांनी त्यांची पहिली टीव्ही जाहिरात विश्वचषक जिंकलेल्या दोन कर्णधारांबरोबर शूट केले.

ते पुढे म्हणाले “हे दोघे उत्कृष्ट कर्णधार आहे. मला जुने दिवस आठवले. मी या स्टेडिअमच्या गॅलरीमधून त्यांना खेळताना बघितले आहे पण त्यांच्यासोबत याच ठिकाणी शूटनिमित्त असणे हा माझ्यासाठी आयुष्यभरासाठीचा अनुभव आहे.”

कपिल देव यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले ” कपिल पहिल्यांदा म्हणाले की मी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल पण जेव्हा त्यांनी गोलंदाजी करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी अनेक बॉल टाकले. त्यांनी फलंदाजीची केली. असे वाटले की कपिल देव यांचे जुने दिवस परत आले.”

या जाहिराती दरम्यान धोनीने तेथील लहान मुलांना खेळाविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. सील यांनी पुढे धोनीला नैसर्गिक अभिनेता म्हटले आहे. याविषयी ते म्हणाले मला धोनीच्या बाबतीत रिटेक घेण्याची जास्त गरज लागली नाही. तो कॅमेरासमोर नैसर्गिक अभिनय करत होता. “

याबरोबरच सील यांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (CAB) अध्यक्ष सौरव गांगुलीचे ईडन गार्डन उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.

जाहिरातीचे शूट पूर्ण झाल्यावर भारताचे तीन महान कर्णधार गांगुली धोनी आणि कपिल देव एकत्र आले. त्यांनी मिळून फोटो काढले.