स्वातंत्र्यदिनी एमएस धोनी करणार हे खास काम?

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी 15 ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनी लेह, लडाखमध्ये ध्वजारोहण करण्याची शक्यता आहे. भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल असलेला धोनी सध्या 106 टीए बटालियन(पॅरा) बरोबर दक्षिण काश्मिरमध्ये आहे.

तो या बटालियनबरोबर 31 जूलै ते 15 ऑगस्ट दरम्यान असणार आहे. गुरुवारी संरक्षण विभागाच्या सुत्रांच्या नुसार धोनी त्याच्या रेजिमेंटबरोबर 10 ऑगस्टला लेहला जाणार आहे. 

आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार एका वरिष्ठ लष्करी अधिकारीने सांगितले की ‘धोनी हा भारतीय लष्कराचा ब्रँड अँबेसिडर आहे. तो त्याच्या यूनिटमधील सदस्यांना प्रोत्साहित करण्यात व्यस्त आहे आणि तो जवानांबरोबर फुटबॉल आणि व्हॉलिबॉलही खेळतो. तसेच या दरम्यान तो यूद्ध प्रशिक्षणही घेत आहे. तो 15 ऑगस्टपर्यंत व्हॅलीमध्ये असणार आहे.’

असे असले तरी धोनी लेह लडाखमध्ये कोठे ध्वजारोहण करणार आहे याची माहीती अधिकाऱ्यांकडून दिली गेली नाही.

धोनीने क्रिकेटमधून दोन महिन्यांसाठी ब्रेक घेतला आहे. त्यामुळे तो भारतीय संघाच्या सध्या सुरु असलेल्या विंडीज दौऱ्यासाठी अनुपलब्ध आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विंडीज विरुद्धच्या पहिल्या वनडेतील विराट कोहलीचा हा व्हि़डिओ होतोय व्हायरल

भारताला एकवेळ नडलेला क्रिकेटपटू आता होणार प्रशिक्षक!

विलियम्सनने चालू सामन्यात चाहत्यांबरोबर असा साजरा केला वाढदिवस, पहा व्हिडिओ