धोनीने तो वादग्रस्त ट्विट केला लाईक, उठले मोठे वादंग ?

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने तब्बल ३ वर्षांनंतर एक ट्विट लाइक केला परंतु त्यामुळे मोठे वादंग उठले आहे.

एमएस धोनीने नोव्हेंबर २००९मध्ये ट्विटरवर पदार्पण केले. या काळात त्याला या माध्यमावर ६.८ मिलियन लोकांनी फॉलोव केले आहे. परंतु धोनीने आजपर्यंत केवळ ४४५ ट्विट केले आहेत.

या ८ वर्षात धोनीने केवळ २ ट्विट लाइक केले होते परंतु त्याने काल एक नवीन ट्विट लाइक करून वाद निर्माण केला आहे. धोनीने पहिला ट्विट १०मार्च २०१३ रोजी पत्रकार राजदीप सरदेसाई यांचा तर ३१ डिसेंबर २०१४रोजी बीसीसीआयचा हैद्राबाद आणि सर्व्हिसेस यांच्यात होणाऱ्या सामन्याचा तो ट्विट होता.

परंतु गुरुवारी धोनीने तिसरा ट्विट लाइक करून वाद ओढवून घेतला आहे. इंडिया न्युजच्या इन्कार या ट्विटरवरून झालेला एक ट्विट लाइक करत हा वाद धोनीने वाढवून घेतला आहे.

२०१९चा विश्वचषक भारतीय संघ जिंकत आहे. हे आता पक्के झाले आहे. सामना फिक्स्ड आहे. असे या ट्विटमध्ये म्हणाले आहे. परंतु हा ट्विट लाइक करण्यामुळे धोनीला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले.

हा लेख कोणत्याही तथ्यांवर आधारित नसून केवळ माजी कर्णधारांच्या जुन्या कामगिरीचा आणि लग्नाच्या वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेऊन लिहिला आहे.

सध्या धोनी संघाचा अविभाज्य भाग असून त्याचे २०१९मध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्थान पक्के आहे.