एम एस धोनीने शास्त्रींच्या अनुपस्थितीत खेळाडूंना दिला कानमंत्र

भारतीय संघ आपल्या एशिया कप स्पर्धेतील आभियानाची सुरुवात 18 सप्टेंबरला हाँगकाँग विरुध्द करणार आहे. त्याच्या दूसऱ्या दिवशी भारताचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूध्द असल्याने खेळाडूंची तयारी देखील जोरात चालू आहे.

भारतीय संघाचे सराव सत्राचे आयोजन आयसीसीच्या ट्रेनिंग अँकॅडमीत केले जाते. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांचे सहकारी येई पर्यंत भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून महेंद्रसिंग धोनीने खेळाडूंना मार्गदर्शन केले.

भारतीय संघाचा दर्जेदार सराव व्हावा यासाठी भारतीय ‘अ’ संघातील फिरकी गोलंदाज मयंक मार्कंडे व अनुभवी डावखुरा फिरकीपटू शाहबाज नादीम यांच्यासह मध्यमगती गोलंदाज एम. प्रसिद्ध कृष्ण, अवेष खान आणि सिध्दार्थ कौल यांना युएईला पाठवले आहे.

टाईम्स नावनुसार  धोनीने दर्जेदार नेट सरावासाठी दुबईला पाठविलेल्या तरुण गोलंदाजांना मार्गदर्शन केले.

भारताचा प्रभारी कर्णधार रोहीत शर्मा आणि मनिष पांडे यांनी नेटमध्ये भरपूर सराव केला. धोनीने स्पिन गोलंदाजीचा सराव केला. अंबाती रायडू आणि केदार जाधव यांनी देखील सराव सत्रात भाग घेतला.

शिखर धवन, केएल राहुल, हार्दिक पंड्या,  दिनेश कार्तिक जसप्रित बुमरा आणि शारदुल ठाकूर – हँगकॉंगच्या सामन्यापूर्वी संघात सहभागी होतील. गेल्या आठवड्यात झालेल्या इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत या सहा खेळाडूंनी भाग होता.

एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ पुढील प्रमाणे आहे :

रोहित शर्मा (कर्णधार)शिखर धवन(उपकर्णधार)केएल राहुलअंबाती रायडूमनीष पांडेकेदार जाधवएमएस धोनी (यष्टीरक्षक)दिनेश कार्तिकहार्दिक पंड्याकुलदीप यादवयुझवेंद्र चहलभुवनेश्वर कुमारजसप्रीत बुमराहशार्दुल ठाकूरखलील अहमद आणि अक्षर पटेल.

महत्त्वाच्या बातम्या:

मितालीच्या विक्रमांच्या यादीत आणखी एक मनाचा तुरा

-पाकिस्तानचे हे पाच खेळाडू ठरु शकतात भारताला डोकेदुखी

-अखेर लाल माती गहिवरली!!!