आज होणार माजी कॅप्टन कूल धोनीकडून हा कूल विक्रम

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक एमएस धोनीकडून आज एक खास विक्रम होऊ शकतो. त्याने जर आज यष्टींमागे २ फलंदाजांना जर बाद केले तर तो वनडेत ४०० विकेट्स यष्टींमागे घेणारा तिसरा खेळाडू बनणार आहे.

धोनीने ३१४ सामन्यात आजपर्यंत ३९८ खेळाडूंना यष्टींमागे बाद केले आहे. या यादीत अव्वल स्थानी कुमार संगकारा असून त्याने ४०४ सामन्यात ४८२ खेळाडूंना बाद केले आहे तर दुसऱ्या स्थानावरील ऍडम गिलख्रिस्टने २८७ सामन्यात ४७२ फलंदाजांना तर तिसऱ्या क्रमांकावरील मार्क बाऊचरने २९५ सामन्यात ४२४ फलंदाजांना बाद केले आहे.

धोनीने ३९८ मधील २९३ झेल घेतले असून १०५ फलंदाजांना यष्टिचित केले आहे. यष्टिचित करण्यात धोनी अव्वल असून तो सोडून आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला ९९ पेक्षा जास्त खेळाडूंना यष्टिचित करता आले नाही.