Video: जेव्हा धोनीच्या मस्करीमुळे घाबरतो ‘हिटमॅन’ रोहित शर्मा

तिरुअनंतपुरम। गुरुवारी (1 आॅक्टोबर) भारतीय संघाने विंडीज विरुद्ध पाचव्या वनडे सामन्यात 9 विकेट्सने विजय मिळवत 5 सामन्यांची वनडे मालिकाही 3-1 ने जिंकली. हा विजय भारतीय संघाने हॉटेलमध्ये परतल्यानंतर साजरा केला आहे.

त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय संघातील खेळाडू एकमेकांची मजा करताना दिसून आले आहेत. यामध्ये भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीनेही अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजासह रोहित शर्माची मस्करी केली आहे.

बीसीसीआयने या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे की ‘संघ लवकर विजय मिळवून हॉटेलमध्ये परतला आहे. आता विजय साजरा करण्याची वेळ आहे.’

या व्हिडिओमध्ये दिसते की रोहित केक कापत असताना त्याच्या मागे धोनी हातात फुगे घेऊन उभा आहे आणि त्याच्या शेजारी जडेजा उभा आहे. यावेळी धोनी जडेजाला रोहितच्या डोक्यावर हा फुगा फोडू, असे सांगताना दिसत आहे. त्याचप्रमाणे धोनीने तो फुगा रोहितच्या डोक्यावर धरला आणि जडेजाने तो फोडलाही.

फुगा फुटण्याच्या आवाजाने रोहित मात्र दचकला. रोहितची ही अवस्था पाहुन भारतीय संघातील सर्वच खेळाडूंना हसू आवरता आले नाही.

त्याचबरोबर रोहितने केक कापल्यावर केदार जाधवच्या चेहऱ्याला केक लावत त्याची मजा घेतली.

भारतीय संघ आता 4 नोव्हेंबर पासून विंडीज विरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली असून रोहित शर्मा भारतीय संघाचे प्रभारी कर्णधारपद संभाळेल. तसेच धोनीला या मालिकेतून वगळण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

धोनीवर टीका करण्याआधी धोनीची २०१८मधील कामगिरी नक्की पहा

केवळ एकच सामना खेळलेल्या उसेन बोल्टने फुटबॉल क्लबला केले अलविदा

धोनीबरोबरच टी२० खेळत नसलेला खेळाडू म्हणतोय, धोनी संघाचा अविभाज्य भाग आहे

विराटचं ठीक आहे, बाकी खेळाडूंची आयसीसी क्रमवारी नक्की पहा