पहा: कोलकाता वनडेमधील धोनीची कमाल कामगिरी !

माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला पुनरागमन करून दिले होते. भारताला त्याने बिकट परिस्थितीतून बाहेर काढून सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले होते. दुसऱ्या वनडे सामन्यात धोनीला फलंदाजीमध्ये त्याच्या नावला साजेशी कामगिरी करता आली नाही पण त्याने त्याची कसर क्षेत्ररक्षणात भरून काढली.

भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या फलंदाजांना टिकून दिले नाही. त्याने नव्या चेंडूचा पुरेपूर वापर करून दोनही सलामीवीर फलंदाजांना एक आकडी धावसंख्येत तंबूत पाठवले. पण कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी डाव सावरण्याची कामगिरी केली. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर धोनीने कमालीची कामगिरी करून मॅक्सवेलला बाद केला आणि त्यानंतर कुलदीपच्या हॅट्रिकमध्येही एक उत्कृष्ट झेल घेतला.

पाहुयात काय कमाल केली धोनीने !

कुलदीपच्या गोलंदाजीवर धोनीने घेतलेला अप्रतिम झेल !