पहा धोनीचा हा कूल’नेस

चेन्नई । एमएस धोनीने काल जबदस्त अर्धशतकी खेळी केल्यानंतर आज आपण किती कूल आहोत आणि आपल्याला कॅप्टन कूल का म्हटलं जात याची प्रचिती दिली आहे.

काल भारतीय संघाने सामना जिंकल्यानंतर आज संघ पुढील सामन्यासाठी रवाना होण्यासाठी चेन्नई विमानतळावर आला. तेव्हा खेळाडू विमानाची प्रतीक्षा करत होते. सर्व खेळाडू फ्लोअरवर बसलेले आहे. परंतु धोनी हा मस्त फ्लोवरवर झोपून आराम करत असल्याचे फोटो बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहे.

श्रीलंका दौऱ्यावरही जेव्हा प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केल्यामुळे सामना थांबवण्यात आला होता तेव्हा धोनीने मैदानात आरामात झोपून घेतले होते. तसेच काहीसे दृश्य यावेळी चेन्नई विमानतळावर पाहायला मिळाले.

यावेळी केएल राहुलनेही एक खास फोटो शेअर केला आहे आणि त्यात म्हटले आहे की जेव्हा तुम्ही १-० बढत घेता तेव्हा असा आराम करता.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा सामना २१ सप्टेंबर रोजी इडन गार्डन कोलकाता येथे होणार आहे. भारताचा माजी दादा कर्णधार आणि सध्या बंगाल क्रिकेट असोशिएशन सर्व सूत्र संभाळणाऱ्या सौरव गांगुलीने या सामन्यासाठी सर्व तयारी झाल्याचे यापूर्वीच घोषित केले आहे.