पीटरसनची झाली फजिती…

टेकनॉलॉजीचा जसा चांगला उपयोग होतो तशी तीच टेकनॉलॉजी कधी कधी फजितीही करते याचा अनुभव काल टेक्नोसॅव्ही केविन पीटरसनला काल पुण्यात आली. त्याच झालं असं काल पुणे सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल पर्व १० मधील दुसरा सामना पुण्यात झाला! या सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षण करताना पुण्याचा मनोज तिवारी माइकद्वारे इंग्रजी समालोचक इंग्लंडचा केविन पिटरसॅनने धोनीची चेष्टा करण्याचे ठरवले. तेव्हा मनोज तिवारीकडे क्षेत्ररक्षण करत असताना माइक होता. पीटरसन तिवारीला बोलला “धोनीला सांग मी (पीटरसॅन)त्याच्या (धोनी)पेक्षा चांगला गोल्फ खेळाडू आहे ”
हे तिवारीने धोनीला सांगितल्यावर धोनीने आपला हजरजबाबीपणा दाखवत उत्तर दिले
“तरी माझा पाहिला कसोटी बळी हा तूच (पीटरसॅनच)होता”
हे उत्तर ऐकल्या नंतर समालोचक कक्षामध्ये एकच हास्य उडाला .
पीटरसॅनची फजिती झाली पण धोनीने आपला हजरजबाबीपणा दाखवून दिला.