कॅप्टनकूल एमएस धोनीने वाचवले या भारतीय गोलंदाजाचे करियर…

भारताचा वेगवान गोलंदाज इंशांत शर्माने त्याला संघातून वगळण्यापासून माजी कर्णधार एमएस धोनीने वाचवले असल्याचे मत व्यक्त केले आहे.

इशांत म्हणाला, ‘जेव्हा मी माही भाईच्या नेतृत्वाखाली खेळत होतो. तेव्हा त्याने नेहमी मला पाठिंबा दिला. एकावेळ तर अशी होती की मी संघाबाहेर जावू शकत होतो, पण मला वगळण्यात आले नाही. धोनी ज्याप्रकारे मैदानात मार्गदर्शन करत असतो, त्याने मदत होते. तो संघासाठी मौल्यवान आहे. तो कर्णधाराला मदतही करतो. तो दिग्गज आहे.’

विराट कोहलीबद्दल इशांत म्हणाला, ‘संघातील वरिष्ठ खेळाडूच्या नात्याने विराट नेहमी माझ्या जवळ येतो आणि मला सांगतो, ‘मला माहित आहे तू थकला आहेस, पण तरी तू संघातील वरिष्ठ असल्याने तुला गोलंदाजी करावी लागेल. मला तूझ्यावर विश्वास आहे.’

इशांतने मागील काही महिन्यांपासून कसोटीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण मात्र तो जवळ जवळ 3 वर्षांपासून वनडे क्रिकेटपासून दूर आहे. त्याने आत्तापर्यंत फक्त 80 वनडे सामने खेळले आहेत.

याबद्दल बोलताना इशांत म्हणाला, ‘मला वाटते की मी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये नसण्यामध्ये ‘ ‘धारणांचा’ हे मोठा भाग आहे. मला माहित नाही या धारणा कोठून येतात.’

‘ते आम्हाला कसोटी गोलंदाज, टी20 गोलंदाज असे टॅग देऊन टाकतात. हे सर्व त्रासदायक आहे.’

तसेच इशांतने दोन महिन्यांनी होणाऱ्या विश्वचषकातही स्थान मिळण्याची आशा व्यक्त केली आहे.

तो म्हणाला, ‘तूम्ही जर लाल चेंडू चांगला हताळत असाल तर तूम्ही कोणत्याही प्रकारात चांगला खेळ करु शकता. आम्ही खेळत असलेल्या सर्व क्रिकेटचे ते मूळ आहे. तूम्ही तूमच्या विविधतेवर विश्वास ठेवला पाहिजे. मी जर मर्यादीत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली तर मला खात्री आहे मी विश्वचषकामध्ये चौथा वेगवान गोलंदाज ठरु शकतो. भारतीय संघ अजूनही चौथा वेगवान गोलंदाज शोधत आहे.’

तसेच इशांतने आता चांगल्या गोलंदाजीबरोबरच विकेट्स घ्यायच्या असल्याचे मत मांडले आहे. तो म्हणाला, ‘मी चांगली गोलंदाजी करतो हा टॅग ऐकून त्रासलो आहे. आता मला फक्त विकेट्स घ्यायच्या आहेत. विकेट्सच ही एकच गोष्ट आहे जी ज्याला आपण ‘धारणा’ म्हणतो ती बदलू शकते. ”

तसेच इशांत म्हणाला, तो कोणत्याही गोष्टीसाठी दुसऱ्यांना दोष न देता स्वत:ला दोष देतो. त्याचबरोबर त्याने ससेक्स या कौउंटी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जेसन गिलस्पी यांचे चार सामन्यात त्याला संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

या कारणामुळे रिषभ पंत म्हणतो, माझी धोनीबरोबर तुलना नको…

…म्हणून विजेतेपद मिळवण्यास रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला आले अपयश, कोहलीने केले स्पष्ट

या दिवशी होणार आयपीएल २०१९ चे संपूर्ण वेळापत्रक घोषित