Video: एमएस धोनी म्हणतो, झिवा माझ्यापेक्षा चांगला डान्स करते

भारताचा माजी ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीची 3 वर्षांची मुलगी झिवा सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. नुकताच धोनीने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला आहे.

या व्हिडीओत ती एका इंग्लिश गाण्यावर डान्स करत आहे.धोनीने इंस्टाग्रामवरून तिच्या या डान्सचा व्हिडीओ शेयर करताना त्याला “वडिलांपेक्षा तरी चांगला डान्स करते” असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.

View this post on Instagram

Dances better than the father atleast

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

त्याचबरोबर धोनीने तिचे आणखी दोन व्हिडीओही शेयर केले आहे. यातील एका व्हिडिओत झिवा “सीएसके, सीएसके” आणि “कमॉन पापा” असे म्हणत चेन्नई सुपर किंग्जला पाठिंबा देत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत चेन्नई सुपर किंग्जला फ्लाइंग किस देत आहे.

याआधीही काही दिवसांपूर्वी धोनीने झिवाबरोबरचे व्हिडीओ शेयर केले आहेत. तसेच आजच सुरेश रैनाने त्याची मुलगी ग्रेशिया, हरभजनसिंगची मुलगी हिनाया आणि धोनीची मुलगी झिवा या तिघींचा एक गोड व्हिडीओ शेयर केला होता. त्याही व्हिडीओने सोशल मेडियावर चाहत्यांची मने जिंकली आहेत.

सध्या चेन्नई संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांनी आत्तापर्यंत 7 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले असून 2 सामन्यात पराभव पत्करला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या –

चेन्नई सुपर किंग्जचा हा खेळाडू दोन आठवड्यांसाठी आयपीएलला मुकणार

IPL 2018: बेंगलोर की कोलकाता, विजयाच्या मार्गावर कोण परतणार?

– राफेल नदालने क्ले कोर्टवरील 400 वा विजय साजरा करत रचला मोठा विक्रम

ऑस्ट्रेलियाच्या या शहरातून मिळाले ३ विश्वचषक विजेते खेळाडू

IPL 2018: आज राजस्थान-हैद्राबाद आमने-सामने

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४- दैव देते, कर्म नेते!!