खराब फाॅर्ममध्ये असलेल्या धोनीला गावसकरांचा सल्ला, आधी हे काम कर!

एशिया कप स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली आहे. मैदानावर सतत महत्वाची भुमिका बजावणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचा फलंदाजीतील खराब फॉर्म चालुच आहे.त्याचा खराब फॉर्म ही भारतासाठी डोकेदुखी ठरु शकते.

यावर भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी परखड मत व्यक्त केले आहे.

“आयपीएलमधील दमदार कागिरीनंतर धोनीचा वन-डे मधील खराब फॉर्म चालूच आहे.धोनीने घरगुती क्रिकेट खेळून फॉर्ममध्ये येण्याची गरज आहे”, असे मत भारताचे माजी महान खेळाडू सुनिल गावसकरांनी मांडले आहे.

“50 षटकांच्या सामन्यात खेळाडूला कमी खेळण्याची संधी मिळते. त्या तुलनेत चार दिवसीय सामने खेळल्यानंतर पायांची तग धरून राहण्याची क्षमता वाढते. धोनी झारखंडकडून खेळल्यामुळे तेथील उदोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन देखील तो करू शकतो.” असा सल्ला ते धोनीला द्यायला विसरले नाहीत.

पुढे बोलताना त्यांनी धोनीच्या मार्गदर्शनाचा संघाला उपयोगच होईल अशी भूमिका मांडली. “रोहित शर्मा असो किंवा विराट कोहली सामन्यादरम्यान रणनिती बनवण्यात धोनीची भुमिका महत्वाची असते. आपल्या अप्रतिम विकेटकिपींगने प्रतिस्पर्ध्याच्या मनात धास्ती निर्माण धोनीने केली आहे. फलंदाजीतील त्याचा फॉर्म हेच फक्त चिंतेचे कारण आहे”, असे गावसकरांनी इंडिया टु़डेशी बोलताना सांगितले.

धोनीने चालू वर्षात खेळलेल्या 9 वन-डे सामन्यात त्याने 27 च्या सरासरीने फक्त 189 धावा केल्या आहेत.  42 ही त्याची या वर्षातील सर्वोत्तम धावसंख्या आहे.

2019 विश्वचषक स्पर्धेत त्याने सर्वोत्तम फिनीशरच्या भुमिकेत पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे.

आज (२८ सप्टेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश आशिया कपचा अंतिम सामना होत आहे. यात धोनीच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील.

महत्त्वाच्या बातम्या-

३ तासांत फलंदाजाकडून २३ षटकार आणि १५ चौकारांची बरसात, रोहित शर्माचा विक्रम थोडक्यात वाचला

एशिया कप २०१८: टीम इंडिया सातव्यांदा विजेतेपद मिळवण्यास सज्ज

मराठमोळा रिशांक देवाडीगा करणार यूपी योद्धाचे नेतृत्व

एशिया कपमधील खराब कामगिरीचा मला बळीचा बकरा बनवले गेले

कोरिया ओपनच्या उपउपांत्यपुर्व सायनाचा धडाक्यात प्रवेश