पाकिस्तानी चाहत्यांना हवे आहेत कोहली, धोनी वर्ल्ड ११ संघात

लाहोर: आजपासून वर्ल्ड ११ आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान ३ टी२० सामन्यांची मालिका सुरु होत आहे. पाकिस्तान देशात यामुळे मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती केली जात आहे. लाहोर शहरात होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मोठ्या प्रमाणावर शहरात खेळाडूंचे स्वागत करणारे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत.

फाफ डुप्लेसीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, विंडीज, बांगलादेश, श्रीलंका, न्युझीलँड या देशातील खेळाडूंचा समावेश आहे. आयसीसी क्रमवारीत पहिल्या ९ स्थानांवर असलेल्या संघातील केवळ भारतीय संघाचे खेळाडू या मालिकेत सहभागी होणार नाही.

यामुळे येथील क्रिकेटप्रेमी मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. पाकिस्तान देशातील अनेक आजी माजी खेळाडूही भारतीय खेळाडूंचा समावेश नसल्याकारणाने आपली नाराजगी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आहे.

क्रिकेट जगतात सार्वधिक क्रेझ असलेले दोन खेळाडू म्हणजे एमएस धोनी आणि विराट कोहली. या दोन खेळाडूंनी ह्या मालिकेत सहभागी व्हायला पाहिजे म्हणून अनेक प्रेमींनी ट्विट केले आहेत.

सध्या भारतीय संघात असलेल्या खेळाडूंमध्ये केवळ एमएस धोनी आणि रोहित शर्मा हे खेळाडू पाकिस्तान देशात खेळले आहेत तर युवराज सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, गौतम गंभीर, आशिष नेहरा, पियुष चावला, प्रवीण कुमार, युसूफ पठाण, प्रज्ञान ओझा, श्रीशांत, इशांत शर्मा, हरभजन सिंग आणि पार्थिव पटेल हे सध्या संघाबाहेर असलेले परंतु निवृत्ती न घेतलेले खेळाडू यापूर्वी पाकिस्तानात खेळले आहेत.

भारतीय कर्णधार विराट कोहलीला कधीही पाकिस्तानात खेळायला मिळाले नाही. विराटचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले त्यापूर्वी काही महिने आधी भारतीय संघ शेवटच्या वेळी पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. विराट कोहलीला याची नक्कीच खंत असेल की त्याला या देशात क्रिकेट खेळायला मिळाले नाही.

विराट आणि धोनीचे चाहते ह्या देशात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सहाजिकच हे चाहते आपली नाराजगी ट्विटरवरून व्यक्त करत आहेत.

https://twitter.com/tahseenraza514/status/907281490249113600?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fcricket%2Fms-dhoni-virat-kohli-on-pakistani-fans-wishlist-as-cricket-returns-to-country-1749087

https://twitter.com/tahseenraza514/status/907280853058965504?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fcricket%2Fms-dhoni-virat-kohli-on-pakistani-fans-wishlist-as-cricket-returns-to-country-1749087