व्हिडीओ: धोनीने असा साजरा केला पत्नी साक्षीचा वाढदिवस

भारतीय संघाचा माजी कर्णधार एम एस धोनीने त्याची पत्नी साक्षीचा वाढदिवस परवा साजरा केला. याबद्दलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ धोनीची मैत्रीण आणि हेयर स्टायलिस्ट सपना भावनानीने पोस्ट केला आहे.

धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने तो सध्या फक्त वनडे आणि टी २० क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे त्याला कुटुंबासाठी जास्त वेळ मिळत आहे. साक्षीच्या वाढदिवसाच्या या व्हिडीओमध्ये साक्षीने केक कापल्यावर धोनीने तिला केक भरवला आहे असे दिसते.

सपना भावनानीने हा व्हिडीओ पोस्ट करताना “साक्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा” असे लिहिले आहे.