200 वनडेत नेतृत्व करणारे कर्णधार

दुबई। आज (25 सप्टेंबर) एशिया कप 2018 स्पर्धेत भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सुपर फोरचा सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

हा धोनीचा वनडे कर्णधार म्हणून 200 वा सामना आहे. 200 वनडे सामन्यात नेतृत्व करणारा धोनी हा एकूण तिसराच क्रिकेटपटू ठरला आहे.

याआधी आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेंमिंग यांनी 200 पेक्षा जास्त वनडे सामन्यात त्यांच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रम पॉटिंगच्या नावावर आहे. त्याने 230 वनडे सामन्यात आॅस्ट्रेलियाचे कर्णधारपद सांभाळले आहे. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर फ्लेंमिंग असून त्यांनी 218 वनडे सामन्यात न्यूझीलंडचे नेतृत्व केले आहे.

याबरोबरच धोनी हा सर्वाधिक वनडे सामन्यात नेतृत्व करणारा पहिला आशियाई क्रिकेटपटूही ठरला आहे.

धोनीने जानेवारी 2017 मध्येच भारतीय संघाच्या मर्यादित षटकांचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर विराट कोहलीकडे भारताची धूरा सोपवली आहे. तसेच धोनीने 2014 मध्येच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.

पण सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या एशिया कपमधून विराटला विश्रांती दिली असून रोहित शर्माकडे प्रभारी कर्णधारपद आणि शिखर धवनकडे उपकर्णधारपद सोपवले आहे.

परंतू एशिया कपमध्ये आज होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सुपर फोरमधील सामन्यासाठी रोहित आणि शिखर या दोघांनीही विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धोनी या सामन्यात भारताचे कर्णधारपद सांभाळत आहे.

धोनीने आॅक्टोबर 2016 मध्ये भारताचे वनडेत शेवटचे नेतृत्व केले होते. नंतर जवळ जवळ दोन वर्षांनी तो भारताचे वनडे सामन्यात नेतृत्व करत आहे.

सर्वाधिक वनडे सामन्यात नेतृत्व करणारे कर्णधार-

230 सामने – रिकी पॉटिंग

218 सामने – स्टिफन फ्लेमिंग

200 सामने – एमएस धोनी

महत्वाच्या बातम्या –

-…आणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल

रोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित

म्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल