एमएस धोनीच्या चाहत्यांना वाटते तो उसेन बोल्टपेक्षा वेगवान !!

0 83

भारतात सचिन नंतर जर कुठल्या क्रिकेटपटूला लोक देवाप्रमाणे पूजत असतील तर तो म्हणजे भारताचा माझी कर्णधार महेंद्र सिंग धोनी. पण कधी कधी हे धोनीचे चाहते अती करतात आणि तिथेच नेमकी माती होते.

ट्विटरवर उसेन बोल्ट त्याच्या शेवटच्या शर्यतीमुळे ट्रेंडिंग होता. जगभरातून त्याला शुभेच्छा येतच होत्या. तो त्याची शर्यत हरल्यानंतरही त्याला त्याच्या अप्रतिम कारकिर्दीसाठी शुभेच्छा येत राहिल्या. तेव्हा श्रीलंकेचा माझी कर्णधार महेला जयवर्धने ही त्याला शुभेच्छा दिल्या. त्याने एक ट्विट केला ज्यात त्याने असे लिहले होते की त्याला उसेन बोल्ट बद्दल आदर वाटतो.

त्यानंतर त्याच्या या ट्विटला धोनीच्या चाहत्यांनी प्रतिउत्तर दिले. त्यातील एक जण म्हणाला की असाच आदर धोनीबद्दल ही ठेव कारण तो उसेन बोल्टपेक्षा ही वेगवान आहे.

याला उत्तर देत महेला चेष्टेत म्हणाला की धोनी त्याच्या गाडीवर होता का ?

ट्विटरवर सेलेब्रिटीजची आज काल खूप चेष्टा होतच असते, नुकताच सचिन जेव्हा राज्यसभेत आला तेव्हा अनेक लोकांनी त्याची चेष्टा केली होती.

पहा काय घडले महेला आणि धोनीच्या चाहत्यांनमध्ये:

Comments
Loading...
%d bloggers like this: